🕒 1 min read
मुंबई : लॉर्ड्स मैदानावर टीम इंडियाला इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला १०० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाला इंग्लंडकडून निर्धारित ५० षटकात २४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु रीस टॉप्ली आणि डेव्हिड विली यांच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचे फलंदाज १४६ गारद झाले.
दुसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असे दिग्गज स्टेडियममध्ये उपस्थित होते. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारतीय संघ संकटात असताना महेंद्रसिंग धोनी लाईव्ह प्रक्षेपणात स्क्रीनवर दिसला. धोनीचा हा व्हिडिओ काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताचा सर्वोत्तम फिनिशर असलेल्या माहीची चाहत्यांना उणीव भासत असल्याचे समोर आले.
https://twitter.com/TituTweets_/status/1547648342905171968?t=BTXmWpeVRnbF1blmfmV1xQ&s=19
महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघात अनेक वर्षांपासून ‘फिनिशर’ची भूमिका बजावली होती. तो भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर ठरला होता. भारतीय संघाला अडचणीत पाहून ‘माही भाई’चे चाहते त्याला बॅट घेऊन मैदानात येण्याचा सल्ला देऊ लागले. महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी ३५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यांमध्ये ८४ वेळा नाबाद राहून १०७७३ धावा ठोकल्या आहेत.
Dhoni Bhai EK Last Baar Pad Phenlo Aur Bachalo pic.twitter.com/d9i127xmun
— CWM (@Cricketwithme15) July 14, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीचा विक्रम विरोधी संघावर आणखी सरस ठरतो. त्याने १९४ एकदिवसीय सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी केली आहे. २००४ ते २०१९ या काळात धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० वेळा नाबाद असताना ५१ च्या सरासरीने ४८४९ धावा केल्या आहेत. नाबाद १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. जी त्याने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साकारली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
- Sanjay Raut : “चिठ्या देतात, माईक खेचतात…” ; संजय राऊतांची शिंदे सरकार टीका
- Mumbai Cricket : ज्या मैदानावर विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी गिरवले क्रिकेटचे धडे, त्याला लागले कुलूप; वाचा!
- Sanjay Raut | मी शिवसेनेचा मालक आहे का?- संजय राऊत
- Bala Nandgaonkar : “भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली ती मनसेकडून…”; बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
