Share

Mumbai Cricket : ज्या मैदानावर विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी गिरवले क्रिकेटचे धडे, त्याला लागले कुलूप; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईच्या पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंनी क्रिकेटचे धडे गिरवले त्या मैदानाला आता कुलूप लागले आहे. हे मैदान मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेले एअर इंडियाचे मैदान आहे. याच मैदानावर पृथ्वी आणि यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूंनी वर्षानुवर्षे आपल्या फलंदाजीचे कौशल्य आत्मसात केले. एवढेच नाही तर श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज चामिंडा वासने नुकताच या मैदानावर कोचिंग कॅम्प लावला होता. असे असतानाही या मैदानाच्या गेटला कुलूप लावण्यात आले आहे.

हे मैदान मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या मालकीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आहे. जे गेल्या वर्षी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) ने ताब्यात घेतले होते. बुधवारी एमआयएएलने या मैदानाला कुलूप लावले. तसेच या मैदानावर कोणतीही क्रीडा कार्यक्रम आयोजित केल्यास कायदेशीर परिणामांचा इशारा दिला आहे.

या मैदानावर ६० वेगवेगळ्या क्रिकेट नेट चालवल्या जातात, ज्यामध्ये क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार मुले प्रशिक्षण घेतात. हे मैदान बंद झाल्यामुळे युवा क्रिकेटपटूंना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. आता या भागापासून सर्वात जवळची क्रिकेट सुविधा दक्षिण मुंबईतील क्रॉस ग्राउंड येथे आहे. ते मैदान येथून २२ किलोमीटर अंतरावर आहे. या सांताक्रुझ भागातील मैदानावर केवळ क्रिकेटपटूच सरावासाठी येत नाहीत, तर इतर अनेक खेळांचे खेळाडूही सराव करतात.

विमानतळ एमआयएएलच्या देखरेखीत आहे

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, एअर इंडियाचे प्रादेशिक संचालक रवी बोधडे यांना लिहिलेल्या पत्रात एमआयएएलने म्हटले आहे की, “स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एमआयएएलला दिली आहे. त्यामुळे आम्ही त्याचा ताबा घेतला आहे. आता या मैदानावर कोणत्याही प्रकारच्या हालचालींना परवानगी नाही. या जमिनीवर कोणीही कोणत्याही प्रकारचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याबाबत आम्ही स्थानिक पोलिसांनाही कळवले आहे. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये.”

स्टार खेळाडू तयार होण्यावर परिणाम होईल : जाफर

मुंबईच्या उपनगरातील हे एकमेव मैदान आहे, ज्याची सीमा ७० यार्ड एवढी आहे. येथे अनेकदा संध्याकाळी फ्लडलाइट्समध्ये सामने होतात. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन व्यतिरिक्त मुंबईच्या रणजी संघातील खेळाडूही या मैदानाचा वापर करतात. याबाबत वसीम जाफर म्हणाला की, “हे मैदान भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी पाइपलाइनसारखे आहे. पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल सारखे खेळाडू याच मैदानातून पुढे आले आहेत. या मैदानावर क्रिकेट खेळणे थांबले तर प्रतिभावान खेळाडू तयार होणे थांबेल.”

या मैदानावर हजारो मुले क्रिकेटचे प्रशिक्षण घेतात

एअर इंडियाकडून खेळणारे माजी वेगवान गोलंदाज आशुतोष दुबे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “येथे ६२ नेट आहेत, जिथे हजारो मुले दररोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी येतात. त्याचबरोबर शूटिंग, टेबल टेनिस, टेनिस आणि बॅडमिंटनच्या सुविधाही या संकुलात उपलब्ध आहेत. हे मैदान पश्चिम आणि मध्य उपनगरातील लोकांना जोडण्याचे काम करते.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!