Share

Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : दिल्लीतील 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी दक्षिण दिल्लीतील वसंत विहार ते गाझियाबादपर्यंत कार चालवत सुमारे 44 किमी गेला. त्यांनी चालत्या कारमध्ये ही घटना घडवून आणली. एवढेच नाही तर आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तरुणीने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले की, “6 जुलै रोजी मैत्रिणीच्या घरून परतल्यानंतर सायंकाळी वसंत विहार मार्केटमध्ये दोन आरोपी तिला भेटले. यावेळी आरोपींनी त्यांच्या इतर मित्रांना बोलावले. जे त्यांच्यासोबत कार घेऊन आले होते. आरोपींना पीडितेला दारु पाजली. त्यांनतर तिला कारमध्ये घेऊन गेले. यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि मारहाणही केली. आरोपींनी या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणाची तक्रार दोन दिवसांनंतर प्राप्त झाल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, “8 जुलै रोजी पहाटे 4 वाजता वसंत विहार पोलिस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने सांगितले की एका मुलीवर तीन पुरुषांनी बलात्कार केला आहे.” हा फोन पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, त्यांची अल्पवयीन मुलगी 6 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता वॅगनआर कारमधून तीन जणांसह वसंत विहार येथून निघाली होती. ते सर्व दुसऱ्या दिवशी ७ जुलैला सकाळी परतले.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!