Share

Sanjay Raut | मी शिवसेनेचा मालक आहे का?- संजय राऊत

Published On: 

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेना संपवल्याचे आरोप होत आहेत. त्यावर आज त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “मी काही शिवसेनेचा मालक नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. लाखो शिवसैनिक हे या शिवसेनेसाठी जीव द्यायलाही तयार आहेत. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेनेसोबत निष्ठेने राहण्याला जर शिवसेना संपवणं म्हणत असतील तर आता निष्ठेच्या व्याख्या बदलाव्या लागतील”, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी विरोधकांना दिले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी संसदेमध्ये काही शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याच्या ठरावावर देखील भाष्य केले. भाजपने स्वतःवरचे कलंक पुसण्यासाठी असा ठराव मंजूर केला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!