मुंबई : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) टी-२० मालिकेला विजयाने सुरुवात केली. साऊथम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ५० धावांनी विजय नोंदवून त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १९८ धावा केल्या, त्यानंतर इंग्लिश संघ १९.३ षटकात १४८ धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये सलग १३ विजय नोंदवणारा पहिला कर्णधार बनला आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने चमकदार कामगिरी केली. हार्दिक टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक आणि ४ विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला. त्याने ५१ धावांचे योगदान दिले आणि ४ बळीही घेतले. डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर त्याने जेसन रॉयला डावाच्या सातव्या षटकात हर्षल पटेलकडे झेलबाद केले. त्याने सॅम कॅरनलाही बाद केले.
https://twitter.com/BCCI/status/1545147694968184832
१९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने वारंवार अंतराने विकेट गमावल्या. यजमान संघाकडून मोईन अलीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याने हॅरी ब्रूक (२८) सोबत पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. मोईनने ४ चौकार आणि २ षटकार ठोकले तर हॅरीने २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त युझवेंद्र चहलने २ विकेट घेतल्या तर पदार्पण सामना खेळणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी १-१ विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. अष्टपैलू हार्दिक पंड्याने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. हार्दिकने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

