परभणी: लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरदार पडत असल्याने लोअर दुधना प्रकल्पात जून महिन्यातच पाण्याची आवक वाढली असल्याने शेतकर्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर लोअर दुधना प्रकल्पात पाणी येते. पावसाळ्याच्या सुरूवातीसच जून महिन्यात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाशयात पाण्याची वेगाने आवक होत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षानंतर लोअर दुधना प्रकल्प धरण शंभर टक्के भरले होते.
लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून सेलू शहराला पाणी पुरवठा केला जातो. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांची पाण्याची मदार आहे. दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दूधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. मात्र प्रथमच जून महिन्यात लोअर दूधना प्रकल्प धरणात ११.१२१ दलघमी पाणी आले आहे.
यावेळेसही धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोअर दूधना प्रकल्प धरणात गेल्या वर्षी शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले. तसेच दूधना नदिपात्रातही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील जलसाठा निम्म्यावर आला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीसच धरणात आवक सुरू झाल्याने सद्य:स्थितीत धरणात ५४.७९ जिवंत जलसाठा उपलब्ध झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद शहरातील लोक जाती-धर्मावर मतदान करतात, त्यांना विकास आवडत नाही’
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

