🕒 1 min read
मुंबई : स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नवी ऐतिहासिक मालिका घेऊन येणार आहेत. २६ जुलैपासून रात्री १० वाजता ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका सुरू होणार असून, स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहेत.
ही भूमिका साकारताना कोणत्याही गोष्टीची कमी राहू नये यासाठी अजिंक्य देव खूप मेहनत घेत आहेत. ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी चक्क केसांना कात्री लावली आहे. अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावली आहे. एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं.
https://www.instagram.com/tv/CRB2UplD2AC/?utm_source=ig_web_copy_link
पुढे ते म्हणाले, प्रेक्षकांना हा लूक आवडेल का याची भीती होती. मात्र माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं असं मला वाटतं अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.
‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिकेत अभिनेता भुषण प्रधान छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिपदाची नाराजी! ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीला
- नितेश राणेंनी एकत्र येण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

