Share

डेवॉन कॉनवेने पटकावला जुन महिन्यातील आयसीसी सर्वोत्कष्ट खेळाडूचा पुरस्कार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जुन महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात न्युझीलंड क्रिकेट संघाचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटुचा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराच्या स्पर्धेत त्याचा सहकारी कायली जेमीसन आणि दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विटंट डिकॉक हे दोघे होते. जानेवारी महिन्यापासुन सुरु झालेल्या या पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंचा समावेश नव्हता.

जानेवारी २०२१ महिन्यापासुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रत्येक महिन्यातील कामगिरीच्या आधारे ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार सुरु केला. यानंतर जानेवारी महिन्यात आर अश्विन, फेब्रुवारी महिन्यात रिषभ पंत आणि मार्च महिन्यात भुवणेश्वर कुमार या भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी केवळ डब्ल्युटीसी स्पर्धेचा अपवाद वगळता कोणताही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्याने या स्पर्धेत मानांकन मिळाले नव्हते.

डेवॉन कॉनवेने पदार्पनातच लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते. तर भारताविरुद्ध डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. तर महिला क्रिकेटपटुच्या स्पर्धेत इंग्लंडची महिला क्रिकेटपटु सोफी इक्लेस्टोनने जुन महिन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. तिला भारताची शेफाली वर्मा आणि स्नेह राणा यांची स्पर्धा होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!