Share

हरारे कसोटीत बांग्लादेशचा झिंबाब्वेवर २२० धावांची विजय, महमुदुल्लाह सामनावीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झिंबाब्वे दौऱ्यावर असलेल्या बांग्लादेश संघाने एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. बांग्लादेशने दिलेल्या ४७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिंबाब्वेचा संपुर्ण संघ २५६ धावांवर अटोपला.

झिंबाब्वेच्या दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यात बांग्लादेशने २३७ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बांग्लादेशने ४६८ धावांची मजल मारली. बांग्लादेशकडुन महमुदुल्लाहने २७८ चेंडुत १७ चौकार आणि १ षटकारासंह नाबाद १५० धावांची खेळी केली. झिंबाब्वेकडुन ब्लेसिंग मुझारबनीने सर्वाधीक ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात झिंबाब्वेचा पहिला डाव २७६ धावांत संपुष्टात आला. यासह बांग्लादेशला पहिल्या डावात १९२ धावांची भक्कम आघाडी मिळाली.

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात टाकुद्ज़्वानाशी कैतानोने ३११ चेंडुचा सामना करतान ९ चौकाराच्या मदतीने सर्वाधीक ८७ धावांची खेळी केली. बांग्लादेशकडुन या डावात मेहदी हसनने सर्वाधीक ५ गडी बाद केले. यांनतर बांग्लादेशने दुसऱ्या डावात १ बाद २८४ धावांवर डाव घोषीत केला. या डावात नजिमुल शांतोने ११८ चेंडुत ५ चौकार आणि ५ षटकारासंह ११७ धावांची नाबाद खेळी केली. चौथ्या डावात झिंबाब्वेसमोर बांग्लादेशने ४७७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिंबाब्वेचा संपुर्ण संघ २५६ धावांवर अटोपला. या डावात झिंबाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलरले ७३ चेंडुत सर्वाधीक ९२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर बांग्लादेशकडुन या डावात मेहदी हसन आणि टस्किन अहमद दोघांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!