🕒 1 min read
मुंबई : अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागुन राहिलेली युरो कप स्पर्धा ११ जुलै रोजी संपुष्टात आली. युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ३-२ असा थरारक पराभव केला. या पराभवासह इंग्लंडचे युरोकप स्पर्धेचे जेतेपदाचे स्वप्न भंगले आहे.
या पराभवासह इंग्लंडचे पहिल्या युरोकप जेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर इंग्लंडच्या फॅन्सनी मात्र रागात येत चक्क गुंडागर्दी सुरु केली. सामन्यादरम्यान जेव्हा इटलीच्या खेळाडूंनी पेनल्टी मीस केली तेव्हा इंग्लंडच्या चाहत्यांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केली. तसेच सामना संपल्यानंतर मैदानातुन बाहेर पडणाऱ्या इटलीच्या चाहत्यावर हल्ला सुरु केला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
The English team has won hearts but their fans (or a section of them) have been an absolute disgrace. Online racist abuse of their players who missed penalties, booing the opponents national anthem and downright hooliganism against Italian fans .. shameful. ???? pic.twitter.com/o768lQNfKu
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) July 12, 2021
इंग्लंडच्या चाहत्यांच्या या कृत्यामुळे युरोकप स्पर्धेतील उपविजेत्या इंग्लंडच्या खिलाडूवृत्तीच्या कामगिरीला गालबोट लागले आहे. याच दिवशी इंग्लंडच्या संघाला इतर दोन पराभवाचा सामना करावा लागला. विम्बल्डनमध्ये ऑस्ट्रेलियाची टेनीसपटु बार्टीने इंग्लंडच्या कॅरोलिनाचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला. तर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी सर्वोत्तम काम केलंय’; उर्मिला मातोंडकर यांनी केलं तोंडभरून कौतुक
- कोरोना म्हणजे थोतांड; वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिरांची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- कोरोनामुळे बॉलीवूडला आर्थिक झळ! तरीही या अभिनेत्याने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची कार
- संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार ? ; उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…
- सावळ्या रंगामुळे सोनालीला देखील करावा लागला वर्णभेदाचा सामना; अनुभव शेअर करत म्हणाली …
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

