🕒 1 min read
औरंंगाबाद : नोबल पब्लिकेशनच्या स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांची पीडिएफ कॉपी स्वत: च्या संस्थेचा वॉटरमार्क टाकून माझी नोकरी पोर्टलवर अपलोड केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी हार्दिक दिनेश सुतारी (वय ४७, रा. कात्रज जि. पुणे) याच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृगांरे-तांबडे यांनी शुक्रवारी (दि.२७) दिले.
प्रकरणात कारभारी कौतीकराव भुतेकर (वय ४७, रा. गट नं.९०/०२ सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, भुतेकर हे लेखक व प्रकाशनाचे काम करतात. त्यांची नोबल पब्लिकेशन नावाची संस्था असून ते स्पर्धा परिक्षांची पुस्तके प्रकाशीत करतात. जून २०१८ ते जुलै २०२० दरम्यान आरोपीने सदरील स्पर्धा परिक्षांची पुस्तके स्कॅन केलेली कॉपी व पुस्तकांचा काही भाग माझी नोकरी या पोर्टल, मिशन खाकी वर्दी या वॉटसअप गृपवरून संपूर्ण महाराष्ट्रात सायबर माध्यमांव्दारे विद्याथ्र्यांना उपलब्ध झालेले आहे.
विशेष म्हणजे पीडीएफ केलेल्या पुस्तकांवर नोबल पब्लिकेशन असलेला वॉटरमार्क फिका करुन त्यावर माझी नोकरीचा वॉटरमार्क टाकून नोबल संस्थेची फसवणूक केली. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- हिमायतबागेतील ‘ते’ अतिक्रमण मनपाने पाडले
- ‘मी भ्रष्ट नाही म्हणूनच भाजप माझ्यावर टीका करतंय’
- ‘बंद’मुळे मराठवाड्यातील अठराशे कोटींची उलाढाल ठप्प
- आमच्या हातात सत्ता द्या मग मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो : चंद्रकांत पाटील
- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनो सावधान !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
