औरंगाबाद : शुक्रवारी, दि. २६ फेब्रुवारी रोजी ‘जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांनी औरंगाबादसह मराठवाड्यात बंद पुकारला होता. बंदला किरकोळ दुकानदार वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला आहे. मात्र, या आंदोलनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी तर मराठवाड्यातील १८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते अशी माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने ‘जीएसटी’च्या माध्यमातून ‘इन्स्पेक्टर राज’ निर्माण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. जीएसटी रिटर्न भरण्यात कधी काही क्षुल्लक चूक झाली किंवा संगणकाच्या माध्यमातून आकडे कमी-अधिक झाले तर दुरुस्त करण्याची मुळीच संधी नाही. अशा छोट्या-छोट्या चुकांसाठीही आमचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते आणि पाच-पाच पिढ्यांपासूनच्या व्यवसायावर संक्रांत येते. मालमत्ता सील केल्या जातात आणि त्यात पुन्हा अधिकाऱ्यांना वाटेल, तसे अधिकार देण्यात आले आहेत.
जीएसटी कायद्याचे नियम कडक आहेतच; शिवाय दंड कठोर आहेत व दंडाचे व्याजदरही १८ ते २४ टक्क्यांपर्यंत आहेत. एखाद्या गुन्हेगारालाही त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते; पण तशी संधी आम्हाला नाही. त्यामुळेच हे ‘इन्स्पेक्टर राज’ आहे, अशी टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. ‘बंद’मुळे मराठवाड्यातील १८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होते, असे मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शहराची निवडणूक ‘ऐतिहासिक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

