Share

आमच्या हातात सत्ता द्या मग मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो : चंद्रकांत पाटील

Published On: 

कोल्हापूर : आमच्या हातात सत्ता मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो, ज्यावेळी आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही हे आरक्षण दिले व कोर्टामध्ये देखील टिकवून दाखवले होते. परंतु दुर्दैवाने महाविकास आघडी सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मराठा आरक्षण हे पूर्णपणे राज्याचा अधिकारात आहे याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केले आहे.

आमचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाचे आरक्षण हायकोर्टात टिकवले व सुप्रीम कोर्टात देखील टिकवून दाखवले. येणाऱ्या सुनावणीमध्ये तरी सरकार पूर्ण तयारी करून उतरेल अशी अपेक्षा करूयात. अन्यथा आमच सरकार आले कि आम्ही कोर्टामध्ये ते योग्य प्रकारे हाताळून हे आरक्षण निशितच टिकवून दाखवू असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने येत्या दीड महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. सरकारने हे करुन दाखवले तर आम्ही तुमचा सत्कार करु. मात्र, सरकारला ही गोष्ट जमली नाही तर मराठा समाज काय करेल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कायदा हातात घेणार नाही, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी याआधी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!