औरंंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लघंन करणा-या अनेक वाहनांना ई चलान मार्फत दंड लावण्यात आलेले आहे. यातील अनेक वाहनधारकांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. यामुळे आता वाहतूक विभागाने ई चलानद्वारे लावण्यात आलेली दंडाची रक्कम न भरणा-या वाहन धारकाचे लायसन्स किंवा वाहन परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शुक्रवारी (दि.२६) दिली.
शहराच्या विविध चौकात किंवा रस्त्यांवर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत होती. या ठिकाणी अनेकदा वाहतूक पोलिसांवर पैसे आकारण्याचा आरोप झालेला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यापासून वाहतूक नियम मोडणा-या वाहनधारकांकडून दंडाची रक्कम शासनाच्या ई-चलानद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वन-स्टेशन-वन-ई-चलान प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत मोटार वाहन कायदा व नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर ई चलान मशिनद्वारे कारवाई करण्यात येत आहे. काही वाहन चालक व मालक यांनी ई चलानद्वारे केलेल्या कारवाईच्या तडजोडीची रक्कम थकीत ठेवलेली आहे. यामुळे अनपेड चलान पेड करून घ्यावे. अन्यथा अशा दंड न भरणा-या वाहनधारकांची यादी सह त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाला देऊन संबंधीत वाहनांच्या वाहन चालकांचे परवाना तसेच वाहन परवाना निलंबन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे देखील शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफुस पुन्हा वाढली; २३ नाराज नेते आज जम्मूत
- लैंगिक शक्ती वाढविण्याच्या लालसेतून ‘या’ राज्यात लोकं खात आहेत गाढवाचे मांस
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- क्या बात है…. सोलापुरात 18 तासात बांधला 25 किमीचा रस्ता, गडकरींनीही केले तोंडभरून कौतुक
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

