🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील पार्किंगच्या जागांवरील अतिक्रमणे हटवून त्या मोकळ्या करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन अतिक्रमण काढणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.२७) सकाळी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे हिमायतबाग चौकातील चार टपऱ्या आणि पाच पत्र्याचे शेड पाडण्यात आले.
शहरातील अनेक भागात राजरोसपणे अतिक्रमण करणे सुरू आहे. अनेकांनी पार्किंगच्या जागा गिळंकृत करून त्याजागी छोटे-मोठे व्यवसाय हॉटेल धारक, चहा टपऱ्यांना त्या जागा भाड्याने दिल्या आहेत. आणि त्यांच्याकडून दिवसाचे ठरल्याप्रमाणे वसुली केली जाते. मात्र यामुळे सदर दुकानात येणार्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. मनपाने पार्किंग गिळंकृत केलेल्या अशा अनेक व्यावसायिक कॉम्प्लेक्सची यादी तयार केली आहे. मात्र ही कारवाई गेले काही दिवस थंडबस्त्यात गेलेली आहे. छोट्या-मोठ्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपर्या हातगाड्या यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू आहे.
हिमायतबाग हा परिसर गेली अनेक वर्षे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. हॉटेल, टपरी चालकांनी रस्त्यापर्यंत ठाण मांडले असून यामुळे वाहनधारक, नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे आज मनपाच्या पथकाने येथील जवळपास सर्वच अतिक्रमण पाडले. या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद,पी.बी. गवळी, मो.मजहर अली,सागर श्रेष्ठ पोलीस कर्मचारी पथक, व अतिक्रमण हटाव पथकाने कार्यवाही पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! विजयवाडा- शिर्डी साप्ताहिक गाडी रुळावर
- औरंगाबाद शहराची निवडणूक ‘ऐतिहासिक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न
- ‘पूजा’साठी भाजप महिला आघाडीचा परभणीत रास्तारोको
- ‘बंद’मुळे मराठवाड्यातील अठराशे कोटींची उलाढाल ठप्प
- चित्राताई या वाघिण आहेत त्या घाबरणार नाहीत : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
