चेन्नई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये दाखल झाले आहेत.
यावेळी राहुल गांधींनी नेहमीप्रमाणेच भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच आपल्यावर भाजप नेते वारंवार टीका का करतात, याचं कारणही राहुल गांधींनी सांगितले आहे.
राहुल गांधी थुथुकुडी येथे सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील हे चीनला माहिती होते. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वंसेवक संघाने देशातील विविध संस्था आणि फ्री प्रेसवर पद्धतशीरपणे हल्ला केला. असे सांगत असतानाच आपम भ्रष्ट नसल्याचा निर्वाळा देत ‘मी भ्रष्ट नाही म्हणून भाजप दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत आहे’, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफुस पुन्हा वाढली; २३ नाराज नेते आज जम्मूत
- लैंगिक शक्ती वाढविण्याच्या लालसेतून ‘या’ राज्यात लोकं खात आहेत गाढवाचे मांस
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- क्या बात है…. सोलापुरात 18 तासात बांधला 25 किमीचा रस्ता, गडकरींनीही केले तोंडभरून कौतुक
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

