Share

प्रवाशांच्या मागणीमुळे स्मार्ट सिटी बस सेवेत वाढ, या मार्गांवरही धावणार!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सिटीबस सेवा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ८ जून पासून पुन्हा एकदा सुरू केली आहे. आता प्रवाशांची मागणी वाढत असल्याने सोमवारपासून आणखी सहा सिटी बस वाढवण्याचा निर्णय स्मार्ट सिटी प्रशासनाने घेतला आहे. या सिटी बस चिकलठाणा ते रांजणगाव असा प्रवास करतील. एकूण २२ बसेस औरंगाबादकरांच्या सेवेत धावतील.

कोरानाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फेब्रुवारीपासून सिटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता सध्या स्थितीत औरंगाबाद शहरातील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने 7 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली त्यानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद शहरात अनलॉक केले आहे. त्यामुळे ८ जून पासून पाच मार्गांवर १६ सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्या सिटी बस दिवसभरात २४१ फेऱ्या करीत आहेत. मात्र आता नागरिकांकडून आणखी बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत असल्याने १४ जून पासून प्रशासनाने आणखी सहा सिटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक राम पावणीकर, उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोडे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यातील पाच मार्गांवरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बसेस मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्ग क्रमांक १९ चिकलठाणा ते रांजणगाव मार्गे सिडको बस स्टँड या मार्गावर सोमवारपासून आणखी सहा बस सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता एकूण बावीस बसेस प्रवाशांच्या सेवेत उतरतील. २२ बसद्वारे ३१३ फेऱ्या पूर्ण केल्या जातील. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच प्रवाशांनाही मास्क घातल्यानंतरच बसमध्ये चढू दिले जात आहे. नियमांचे पालन करीत प्रवास आणि सिटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पावनीकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!