🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे इथल्या अनेकांचा रोजगार हा पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळात ही पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. ही पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. या संबंधी आमदार दानवे यांनी पर्याटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात अमदार अंबादास दानवे यांनी लिहिले की, ‘जिल्ह्यात अंजिठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा आदी पर्यटन स्थळे आहेत. इथे देश-विदेशातून पर्यटक येतात. कोरोनाची साथ आल्यापासून या शहराकडे देशी, परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे हॉटले चालक, वाहतूक करणारे, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटनस्थळी असलेले दुकानदार, कलाकार आदींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्व पर्यटन केंद्रे तातडीने खुली करण्यात यावी.
कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या संबधी या व्यवसायातील लोकांनीही पर्यटन स्थळे खुली करण्याची मागणी केली होती. त्यात आला राज्यात सर्वच ठिकाणी अनलॉक झाले आहे. त्यामुळे आता पर्यटन केंद्र देखील अनलॉक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..


