🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. दरम्यान, आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी अनेकवेळा समोर आली आहे.
आता एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत.’ असं विधान नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केलं आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1404092619928399881?s=20
या विधानावरून आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्यासह यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘अन्याय झाल्यास मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जाऊ, अन्याय झाल्यास मंत्री यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना भिडतील, नाना पटोले यांचं वक्तव्य. यशोमती ठाकूर यांनी केलेली मारहाण पटोलेच्या लक्षात आहे वाटत. काय भाषा? काहीतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान ठेवा,’ असं भाष्य केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

