Share

कोरोनामुळे वैजापूरात कोट्यावधींची कर वसूली थांबली, विकास कामांना मोठा ब्रेक!

Published On: 

🕒 1 min read

वैजापूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींची महसूल वसुली दरवर्षी ८० ते ९० लाख रुपये जमा होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे केवळ ३५ लाखांची वसुली झाली आहे. या वर्षी केवळ गौण खनिज सोडले तर आठवडी बाजार, घरपट्टी पाणीपट्टी वसुलीतून मिळणारा कप हातावर मोजण्या एवढाच जमा झाला आहे. तिजोरीत ठणठणाट झाला असून कारभार चालवायचा कसा असा प्रश्न सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पडला आहे.

कोरोनाचा संसर्ग दोन वर्षांपासून मार्च महिन्यात वाढू लागल्याने त्याचा परिणाम कर वसुलीवर होत आहे. यावेळेस शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा प्रसार झालेला पाहायला मिळाला. कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींवर आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पोलिस, आरोग्य विभागाच्या बरोबरीने सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी कोरोना दक्षता समिती व ग्रामपंचायतीचे प्रशासन खांद्याला खांदा लावून काम करू लागले. मात्र याचा परिणाम वैजापूर तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींच्या कारभारावर झाला.

मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाची समाप्ती. या महिन्यात ग्रामपंचायतीचा सरासरी ७५ ते ८० टक्के कर वसूल होतो. आर्थिक वर्ष संपत असल्याने कर वसुलीच्या प्रमाणावर सरकारकडून निधी मिळत असल्याने ग्रामपंचायत सक्तीने करवसुली करते. मात्र यंदा सलग दोन  वर्षांपासून ग्रामपंचायतीची सर्व यंत्रणा कर वसूली ऐवजी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये गुंतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!