🕒 1 min read
मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात आज 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात आज एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पठ्ठ्याने यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब पण प्रयोग फसला, डिफ्युज करायला गाठले पोलीस स्टेशन
- …तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद
- ‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’ ; कपिल सिब्बल यांचा दावा
- अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेत्या बाप-लेकीचा मृत्यू, तर मामा गंभीर जखमी
- पुण्यात उद्यापासून आणखी नियम शिथिल होणार; जाणून घ्या आज किती सक्रिय रुग्ण ?


