Share

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन समाज एकवटला, औरंगाबाद मनपा निवडणूकीवर बहीष्काराचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूकीवर ओबीसी समाज बहीष्कार टाकणार असल्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी आरक्षणाची लढाई लढण्यासाठी ओबीसी-एससी-एसटी सोशल फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा ठराव घेण्यात आला.

ओबीसींच्या संपलेल्या राजकीय आरक्षणासंबंधी चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजीत बैठकीत “ओबीसी-एस सी- एस टी सोशल फ्रंट” या अराजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांवर काम करण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होईपर्यंत घेण्यात येऊ नये, तमाम ओबीसींतर्फे निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यात येईल. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या संबंधीचे निवेदन मंगळवारी विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे.

अनुसूचित जमाती ( एस टी ) बहुल असलेल्या जिल्ह्यात उदभवलेल्या प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या मुद्यावरूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढे गेले. हे राजकीय आरक्षण राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन न करणे, ओबीसींच्या सद्यस्थितींचा( इम्पिरीकल) डाटा न तयार करणे व ओबीसींमधील जातींची छानणी न करणे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ मार्च २०२१ रोजी रद्द केले.

हे संपलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा टप्प्या, टप्प्यांचा आढावा घेऊन तो शासनांकडून गतीने पूर्ण करण्यासाठी वेळेवेळी निवेदने व प्रसंगी आंदोलने, निदर्शने, धरणे करण्याचे ठरले आहे. ओबीसींची जनगणना अचूक पद्धतीने करण्यात यावी अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!