Share

वकीलाची ७४ लाखांची फसवणूक करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: 

औरंंगाबाद : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लोन अधिकारी असल्याचे भासवून बेरोजगार युवकांना नोकरी लावण्याचे तसेच कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून ७४ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातल्या प्रकरणातील आरोपी शैलेश कांबळे (वय ४८, रा.सिध्दीविनायक अपार्टमेंन्ट, गादिया विहार, गारखेडा) याला छावणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या शैलेश कांबळे याच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश एस.यू. न्याहारकर यांनी बुधवारी (दि.२) दिले.

उस्मानपुरा परिसरातील पन्नालालनगर येथील रहिवासी अ;ॅड. देवकांत बलवंतराव मेश्राम (वय ४५) यांनी २०२० साली शैलेश कांबळे याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी शैलेश कांबळे याने मी अभिनय टॉकीज जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे लोन मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या कोणत्या नातेवाईकाला कर्ज हवे असल्यास किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावायची असल्यास संपर्क करण्याचे सांगितले होते. अ;ॅड. देवकांत मेश्राम यांचा शैलेश कांबळे यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्यांनी आपल्या काही मित्रांना आणि नातेवाईकांना एसबीआय बँकेत नोकरी लावून देण्यासाठी तसेच काहींना कर्ज मिळवून देण्यासाठी कांबळे यांच्यासोबत संपर्क साधला होता.

त्यानंतर कांबळे यांनी अ;ॅड. मेश्राम यांच्याकडून वेळावेळी करून ७४ लाख ५० हजार रूपये घेतले होते. दरम्यान, पैसे देवूनही नोकरी आणि कर्ज मिळत नसल्याने अ;ॅड. मेश्राम यांनी कांबळे यांच्याकडे तकादा लावला असता शैलेश कांबळे हे उडवा-उडवीची उत्तरे देत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अ;ॅड. देवकांत मेश्राम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश कांबळे याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!