Share

आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या एजंटाच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: 

औरंंगाबाद : आरटीओ कार्यालयाने रिक्षा स्क्रॅप (भंगार) करण्याची परवानगी दिल्यावर बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणात एजंट मोहम्मद कलीमोद्दीन मोहम्मद युसूफोद्दीन (वय ४२, रा. गणेश कॉलनी) याच्या पोलीस कोठडीत मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे.पाटील यांनी रविवारी (दि.२३) दिले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रविंद्र दत्तात्रय नारळे (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा.मकसुद कॉलनी, रोशनगेट) व त्याच्या साथीदारांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपासा दरम्यान पोलिसांनी बनवाट अहवाल, स्वाक्षरी, शिक्का व रिक्षा स्क्रॅप केल्याचा एडीट केलेला फोटो बनवून देणारा तनवीर उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन याला अटक केली.

तसेच त्याच्या रोशनगेट येथील तनवीर कलर प्रिंटर्स अ;ॅण्ड वर्कर नावाच्या दुाकनाची झडती देखील पोलिसांनी घेतली असून पोलिसांच्या हाती अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे लागली आहेत. अटकेत असलेल्या मोहम्मद कलीमोद्दीन मोहम्मद युसूफोद्दीन याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे.पाटील यांनी मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!