Share

अर्थसंकल्पात प्राप्तिकर करदात्यांना मिळू शकतो दिलासा !

Published On: 

नवी दिल्ली: यावर्षीच्या कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर करदात्यांना दिलासा मिळू शकतो. यामध्ये ८० हजारांच्या वरील प्राप्तिकर करदात्यांना सवलत मिळू शकते. जुन्या इनकम टॅक्सअंतर्गत सरकार प्रमाणित कपात करू शकते आणि नवीन करप्रणाली अंतर्गत स्लॅब बदलू शकते सध्याचे आयकर गेल्या अर्थसंकल्पात लागू करण्यात आले होते.

कर तज्ञाच्या मतानुसार नवीन यंत्रणेसाठी करदात्यांमध्ये फारसा उत्साह नाही. मात्र सरकारला हे अधिक लोकप्रिय करायचे आहे. तर, येत्या अर्थसंकल्पात करदात्यांना कर वाचविण्यासाठी अधिक हेडरूम देणाऱ्या नव्या स्लॅब रेटमध्ये काही बदल जाहीर केले जाऊ शकतात.

सध्याच्या करधोरणात अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही; 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी कर दर 5 टक्के आहे; 5 ते 7.5 लाख रुपयांपर्यंत 10 टक्के; 7.5 ते 10 लाख रुपयांपर्यंत 15 टक्के, 10 ते 12.5 लाख रुपयांवरील 20 टक्के; 12.5 ते 15 लाख रुपयांवर 30 टक्के हे 60 वर्षांपर्यंतच्या वैयक्तिक करदात्यांसाठी लागू आहे.

आता जुन्या करप्रणालीत काही प्रमाणात बदल होऊन दिलासा मिळणार असल्याची चर्चा आहे, त्यातील एक प्रस्ताव म्हणजे मानक कपात वाढविणे. सध्या, मानक वजावट 50,000 रुपयांपर्यंत आहे. सूत्रांनी सांगितले की, करदात्यांच्या हातात अधिक पैसे देण्यासाठी प्रमाणित कपात मर्यादा वाढविली जाऊ शकते. मात्र गृहनिर्माण कर्जावरील करातही वाढ केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व उपाययोजनांद्वारे करदात्यास 50,000 ते 80,000 रुपयांच्या दरम्यान कर बचत होईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!