Share

‘जसप्रीत बुमराह विरुद्ध रणनीती आखणे कठीण जाते’; इंग्लंडच्या सलामीवीराची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे.

मालिकेपूर्वी दोन्ही संघ आपापली रणनीती आखत असणार हे निश्चितच आहे. मात्र अशातच इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याची प्रतिक्रिया समोर येत असून त्याच्या मते जसप्रीत बुमराहविरुद्ध रणनीती आखणे अवघड आहे.

बर्न्स म्हणाला, “बुमराह हा एक असा खेळाडू आहे ज्याच्या विरुद्ध रणनीती आखणे अवघड जाते. तो गोलंदाजी करताना इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा जाणवतो. मी भारत आणि ऑस्ट्रेलियाची मागील मालिका बघितली होती, ज्यात संपूर्ण भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. भारताची बेस्ट प्लेइंग इलेव्हन नसूनदेखील त्यांनी विजय मिळवला होता. भारतात खेळणे निश्चितच वेगळे असणार आहे व मी या दौऱ्याची वाट बघत आहे.”

इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!