Share

बुढीलेन भागात रात्री गोळीबार; आरोपी फरारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गुरुवारी रात्री उशीरा बुढीलेन भागातील नेहरू भवन रोडवरील भंगाराच्या दुकानाजवळ किरकोळ वादानंतर एका तरुणाने गावठी कट्ट्याने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मांडीवर गोळी लागून एक तरुण जखमी झाला. उपचारासाठी त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार करणारा तरुण फरार असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे.

बुढीलेन-नेहरू भवन रस्त्यावर अनेक वर्षापासून एक भंगाराचे जुने गोदाम आहे. याच्या पाठीमागे चिमण्या हवेलीजवळ काही नागरिक राहतात. या रस्त्यावर रात्री ११ वाजता भंगारचे साहित्य आणि मोठी वाहने उभी करुन रस्ता आडवण्यात आला होता. अब्दुल रजाक या तरुणाने रस्ता का आडवला असा सवाल भंगारमालक राजासेठ यांना केला. त्यावर राजासेठ यांचा चालक अक्रम पुढे येत ६ एम गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. गोळीबारानंतर नागरिकांनी घाबरून दुकाने बंद केली. यानंतर राजासेठ यांनी आपल्या चालकाला समजावून पाठवून दिले.

पण ५ मिनीटानंतर चालक अक्रम पुन्हा घटनास्थळी आला आणि त्याने पुन्हा गावठी कट्ट्याने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये अब्दुल रज्जाक यांचा भाऊ अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२४) याच्या पायाला गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलीस आयुक्त निखील गुप्ता १० मिनीटांत घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत सहआरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.  परंतु मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!