Share

अण्णा हजारे उपोषणावर ठाम; उपोषण थांबवण्यासाठी आज केंद्रीय मंत्री राळेगणसिद्धीत…

Published On: 

अहमदनगर: केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गुरुवारी भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी महाजन भल्या सकाळीच अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले होते. महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर देखील अण्णांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर याच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. तरी देखील अण्णांनी उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता दिल्लीतून हे उपोषण थांबवण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय कृषि राज्य मंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीत येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!