Share

वॉटर ग्रीड योजनेत पैठणचा समावेश करा ;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला रोहयो मंत्री भूमरे यांच्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : नगरोत्थान योजनेमधून जायकवाडीतील पाणीपुरवठा केंद्र, फिल्टर प्लांट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल. तसेच वॉटर ग्रीड योजनेत पैठण शहराचा विचार करावा. त्यासंबंधी आराखडा तयार करावा, अशा सूचना रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वॉटरग्रीड योजनेमुळे पैठणमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

या संदर्भात भूमरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. पैठणमधील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर करणार असल्याचे रोहयोमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठणमधील पाणी प्रश्नांबाबतच्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग, विलास भुमरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, नगराध्यक्ष सुरज लोळगे आदी उपस्थित होते.

पैठण शहरातील प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक ११ मधील पाण्याची समस्या लक्षात घेता याठिकाणी जलकुंभ असण्याबाबतचा विचार भूमरे यांनी मांडला. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या जलकुंभास तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर नवनाथ महाराज मंदिर जलकुंभाचे उद्घाटन  भूमरे व जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे भूमरे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!