मुंबई : वेळ संध्याकाळ ४.४५ वाजताची…पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठकीत होते अन् अचानक मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत मोठा आवाज झाला आणि सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज झाल्या.
दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ही दुर्घटना गंभीर असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्यासह अतिमहत्वाच्या व्यक्तींचा सह्याद्री अतिथीगृहावर राबता असतो. कोट्यवधी खर्चून सुशोभीकरण केलेल्या या वास्तूमध्ये घडलेली दुर्घटना ही जीवघेणी होती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून यावेळी या भागात कोणीही नव्हते. दरम्यान, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘२०-२५ वर्षापूर्वीची इमारत आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केेले आहे. त्यात काही धोकादायक असं काही आलेले नव्हते. परंतु हे झुंबर कसं कोसळले यासंदर्भातील माहिती माझा विभाग घेत आहे. दुरूस्तीचे आदेश दिले आहेत.’
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणास ‘ती’ अट न्यायोचित नाही; भोसले समितीचा अहवाल सादर, चव्हाण म्हणाले…
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

