मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच भारत देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. पंजाब,उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात विधानसभेसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लागले असताना, पंजाब राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. रविवार ६ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाने पंजाब मध्ये आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव घोषित केले आहे. पंजाब राज्यात काँग्रेस पक्षात मुखमंत्री पदासाठी नवजोत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्यात जोरदार स्पर्धा होती, मात्र काँग्रेस पक्षाने आपला आगामी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून चन्नी यांनाच पुढे केल्याने पंजाब काँग्रेसला आगामी निवणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवजोत सिंग सिद्धू हे जाट शिख आहेत तर चन्नी हे दलित शीख आहेत. पंजाब राज्यात दलितांची संख्या ३५ टक्के असल्यामुळे चरणजित सिंग चन्नी यांना काँग्रेसने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. मात्र एवढे दिवस नवजोत सिंग सिद्धू यांना काँग्रेस पक्षाने अति महत्व दिल्याने याचा विपरीत परिणाम काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वे नुसार काँग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
अकाली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अपक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 59 जागांची गरज आहे. तर पंजाब काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला पण अपयश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
महत्वाच्या बातम्या :
- मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर; म्हणाले, कॉंग्रेसला…
- १९ वर्षांखालील ४ अफगाणी क्रिकेट पटूंचा मोठा निर्णय…
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही
- मुंडे बंधू – भगिनीमधील वाद पुन्हा शिगेला, धनंजय मुंडे म्हणाले कि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

