नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच गोव्याला स्वातंत्र्य उशिरा मिळाले याला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या टीकेवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्य बोलत आहे. त्यामुळे पंतप्रधान काँग्रेसला घाबरत आहेत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांचा पूर्ण व्यवसाय मार्केटिंगचा आहे. त्यांच्यातील भीती आजच्या भाषणातून दिसली. राज्यसभेतील संपूर्ण भाषण काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरच होतं. काँग्रेसने काय केले नाही, हे मोदींनी सांगितले. परंतु, भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यावर ते काही बोलले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

