Share

“केंद्राने ट्रेन पाठवल्या तरी, त्या रिकाम्या पाठवणे तुमची जबाबदारी होती”, चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (७ फेब्रुवारी) संसदेत भाषण करताना कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला,असे म्हटले. यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat)अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कितीही दिशाभूल केली, तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं असून मोदींचं एवढंच म्हणणं आहे की, कोरोना काळात आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकून तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना ठाऊकच आहे. प्रत्यक्ष भाजप कार्यकर्ते यांनी कार्य केले आहे. लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान मोदींनी भरून काढलं. त्यामुळे केंद्राने जरी रेल्वे सोडल्या असल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच तुम्हाला चांगल्याचे कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!