Share

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक पोलीस कर्मचारी

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांना शिस्त लावणारे पोलीस कर्मचारीच कोरोनाच्या जाळ्यात अकडत आहेत. नागरिकांना घरात राहण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस मात्र, कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे पोलीस कर्मचारी असल्याची माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे.

या संदर्भात लातूर पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये सध्या लातूर शहरात ९३ अॅक्टिव्ह कोरोना केसेस असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन वरीष्ठ उपअधिक्षक आणि ९१ पोलीस अधिकरी, अंमलदार आणि होमगार्डचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लातूरकरांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोरोना काळात आरोग्य कर्मचारी असो की, पोलीस कर्मचारी.. कर्तव्य बजावत असतांना अनेकांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे दिसून आले. नागरिकांचे संरक्षण करत असताना पोलीस कर्मचारी आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. सर्वसामान्यांनी देखील पोलिसांना सहकार्य करून या महामारीच्या काळात स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव वाचवण्याची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!