मुंबई : सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा दहा धावांनी पराभव केला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघासमोर १८८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र हैदराबादच्या संघाला केवळ १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयाने केकेआरने या मोसमाची सुरुवात विजयाने केली. केकेआरने या विजयासह आयपीएलमध्ये आपल्या विजयाचे शतक साजरे केले.
या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत आपल्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या ट्विटमध्ये शाहरुख म्हणाला की,’आयपीएलमधील १०० वा विजय मिळवल्याने मी खुप आनंदी आहे. सगळे छान खेळले. तुम्ही सर्वजन खुपच छान खेळलात’ असे लिहीले आहे. तसेच या ट्विटमध्ये शाहरुखने केकेआरच्या अनेक खेळांडूना टॅग केले.
Good to hav our 100th IPL match win. Well done boys…@KKRiders @prasidh43 @DineshKarthik @NitishRana_27 #Rahul @Russell12A @harbhajan_singh ( good to see u even if briefly )@Sah75official @patcummins30 actually all were so good to watch.
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 11, 2021
शाहरुखच्या या ट्विटवर अभिषेक बच्चननेही शुभेच्छा देत अभिषेकने ‘अभिनंदन’ असे लिहीले. यादरम्यान शाहरुख त्याच्या आगामी पठाण या चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत दीपिका पादुकोन आणि जॉन अब्राहम आहे. तसेच आर. माधवनच्या ‘रॉकेट्री’ सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये तो दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अवघ्या वीस मिनिटात सेवानिवृत्त कर्मचा-याला भामट्याचा गंडा
- जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी
- रुग्णांना सर्रासपणे सीटी स्कॅन करायला भाग पाडू नका, केंद्रीय पथकाच्या सूचना
- लॉकडाऊन अटळ : आता गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु
- कुंडलिता आणि सीना नदी स्वच्छ करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात


