मुंबई : राज्यात सद्या आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज नाराज असून राज्यभरात आक्रमक आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे धनगर समाज देखील आदिवासींप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी एकवटत आहे.
“मराठा समाजाला आरक्षण मिळावे मात्र ते ओबीसी समाजाच्या कोट्यातून नको अशी भूमिका सुरुवातीपासूनच ओबीसी नेत्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन’ केले जाणार आहे,” अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केली आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल,” असेही ते म्हणाले.
तर, ” मराठा समाजाला जे लाभ दिलं जात आहे, ते आणि तसेच लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत, अशीही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी केली आहे,” असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- हसन मुश्रीफ यांची कोरोनावर यशस्वी मात; कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
- अहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित
- आपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती!
- नगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस
- मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? सामनातून मराठा आंदोलनावर सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

