Share

देशातील पहिल्या महिला अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांचे खास डूडल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गूगलच्या डूडल चे नेहमी वेगळेपण असते. प्रत्येक महत्वाच्या दिवशी गूगल चे खास डूडल असते. तसेच गूगलच्या जन्मदिनानिमित्ताने गूगलने खास डूडल बनवले होते. तसेच आजही गुगल चे खास डूडल बनले आहे. अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांना डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

गुगलने आपल्या वेबसाईटवरील एका नोटमध्ये जोहरा सेहगल (Zohra Sehgal) यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महान महिला कलाकार म्हटलं आहे. गुगलने असे म्हटले आहे की, ‘देशातील अशी पहिली महिला अभिनेत्री होत्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली.’ 1935 पासून 1943 पर्यंत जोहरा सेहगल यांनी उदय शंकर यांच्याबरोबर डान्सर म्हणून काम केलं होतं. भारतासह अमेरिका आणि जपानमध्ये त्यांनी विविध डान्स शोदेखील केले होते.

गुगल दरवर्षी महत्त्वाच्या आणि महान व्यक्तींना डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहत असते. आज भारतातील महान दिवंगत अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांना डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. पार्वती पिल्लई यांनी हे खास गुगल डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये जोहरा सेहगल यांची नृत्य करतानाची छबी आपण पाहू शकतो.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!