मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्व प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच याबाबत सत्य सांगणारा एखादा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?, असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘परमबीर हे राज्याच्या पोलीस महासंचालक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी होते. ठाणे-मुंबईचे पोलीस आयुक्तपद त्यांनी भूषविले. अशा व्यक्तीने काय केले हे संपूर्ण देशाने पाहिले. खाकी वर्दीची प्रतिष्ठाच त्यांनी नष्ट केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवणे व त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या होणे अशा कटात आयुक्तांचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्या कटातील इतर लहान-मोठी पात्रे तुरुंगात जातात, पण कटाच्या सूत्रधारास दिलासा मिळतो. दिल्लीच्या सूचना व आदेश असल्याशिवाय असा दिलासा मिळणे शक्य नाही. याबाबत सत्य सांगणारा एखादा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही? हे आश्चर्यच आहे.’
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचे गेल्या सात वर्षांतील वर्तन एकतर्फी व राजकीय दबावाने प्रेरित आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबातील घटक बनल्याप्रमाणे वागत आहेत. न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा ‘गुलाम’ किंवा ‘प्रचारक’ म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयास स्वतःला जुंपून घेता येणार नाही. भारतीय घटना त्यांना तशी मान्यता देत नाही, पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून…”, संजय राऊतांची टीका
- …यामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?- संजय राऊत
- “पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी…” – उद्धव ठाकरे संतापले
- PAK vs AUS : ऐतिहासिक मालिकाविजय..! तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं रचला नवा इतिहास
- “रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला


