🕒 1 min read
मुंबई : लाहोर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ११५ धावांनी पराभूत करून मालिका १-०ने जिंकली. रावळपिंडी आणि कराचीतील पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३५१ धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ पाचव्या दिवशी २३५ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लायनने ८३ धावांत ५ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा हा पाकिस्तानमधील तिसरा कसोटी मालिकाविजय आहे. ऑस्ट्रेलियन संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानात आला होता.
यापूर्वी १९९८च्या दौऱ्यातही ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-०अशी जिंकली होती. तेव्हा त्यांनी रावळपिंडीतील पहिला सामना एक डाव आणि ९९ धावांनी जिंकला आणि त्यानंतर पेशावर आणि कराचीमधील दुसरी आणि तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सामन्यात ८ विकेट घेणारा कर्णधार पॅट कमिन्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी मालिकावीराचा पुरस्कार उस्मान ख्वाजाला मिळाला. दुसऱ्या डावात सलामीवीर इमाम-उल-हक (७०) याने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार बाबर आझमने ५५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. निर्जीव खेळपट्ट्यांवर यजमानांना आव्हान देण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर टीम इंडिया आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उस्मान ख्वाजाने संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली. या खेळाडूने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ९१ धावा आणि दुसऱ्या डावात १०४ धावा केल्या. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३९१ आणि दुसऱ्या डावात ३ बाद २२७ धावा केल्या. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २६८ धावा करत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १२३ धावांची आघाडी घेता आली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाने बिनबाद ७३ धावा केल्या होत्या, मात्र पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना खेळपट्टीवर पाय ठेवू दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
- औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेंवर कारवाई कधी? अस्तित्वात नसलेल्या शाळांना मंजूर केलं होतं क्रीडासाहित्य!
- ‘मिका सिंह’ला हवी आहे कपिल शर्माच्या पत्नीसारखी जीवनसाथी,म्हणाला
- “एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलं” – अनिल परब
- “जगभरात कोरोनाची चौथी लाट…”, राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य
- पुष्कर जोगच्या ‘अदृश्य’ चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
