कोलकाता – आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. सहा राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. भाजपने खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले होते. तर ममता बॅनर्जी यांनी आपण जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
Too early to say anything because there are so many rounds. Situation will be clear only by evening. We had started from 3 & were challenged that we won't get even 100, we have crossed that mark. We will cross the magic number too: Kailash Vijayvargiya, BJP#WestBengalPolls pic.twitter.com/ZS5LmrGcNF
— ANI (@ANI) May 2, 2021
दरम्यान,निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अनेक फेऱ्या असल्याने सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आम्ही तीनपासून सुरुवात केली होती. १०० जागाही मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, पण आम्ही तो ओलांडला आहे. आम्ही बहुमताचा आकडाही पार करु असा विश्वास भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या बाजूला तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- निवडणूक निकालांपेक्षा लोकांचे जीव वाचणे महत्वाचे : कपिल सिब्बल
- दिलासा: आता प्राप्तिकर भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


