टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सातत्याने हवामान (Weather) बदलत आहे. राज्यात (Maharashtra) आणि देशांमध्ये थंडी (Winter) ची हुडहुडी पसरली असली तरी काही ठिकाणी पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज दिसत आहे. सर्वत्र तापमानामध्ये चढ-उतार बघायला मिळत आहे. एकीकडे काही भागांमध्ये गारठा वाढत आहे तर दुसरीकडे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सकाळी कडाक्याची थंडी पडत असली तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ‘या’ राज्यामध्ये पावसाची शक्यता
सध्या देशामध्ये सर्वत्र थंडीची चाहूल लागली असून दिवसेंदिवस गारठा वाढत आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ बंगाल उपसागराच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह तामिळनाडूमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे तामिळनाडू मधील अनेक भागांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तर उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीर भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtr) थंडीचा कडाका
राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून तापमानामध्ये चढ-उतार सुरू आहे. दरम्यान, पहाटे कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणामध्ये तापमानात कमाल आणि किमान तापमान चढ-उतार सुरू असल्याचे चित्र देखील दिसत आहे. त्याचबरोबर पहाटे काही ठिकाणी धुक्याची चादर पसरत आहे. राज्यामध्ये सध्या किमान तापमान 11 ते 22 अंश दरम्यान असून कमाल तापमान 31 ते 35 अंशाच्या आसपास आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पार हा सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने खाली गेला आहे तर कमाल तापमानातही चढतराची स्थिती दिसून आली आहे. त्यामुळे राज्यात रात्रीच्या वेळी अधिक गारवा जाणवायला लागला आहे. दरम्यान निरभ्र आकाश असल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाची चटके चांगलेच जाणवायला लागले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18° खाली असल्याने पहाटे चांगलाच गारवा वाढू लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- MNS | “राजकारणातील अलका कुबल यांना…”; मनसेच्या ‘या’ नेत्याचा सुषमा अंधारेंना टोला
- Bhaskar Jadhav । “गुलाबराव पाटील आणि सत्तारांना वाण नाही, पण गुण लागलाय”; भास्कर जाधवांचा भाजपला टोला
- Atul Bhatkhalkar | “कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”; अतुल भातखळकरांचे आरोप
- T20 World Cup | भारताचा पराभव होताचं शोएब अख्तर म्हणाला, “नाबाद 170… हा आकडा पुढील बराच काळ…”
- Sudhir Mungantivar | “जगदंबा तलवार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा


