Share

न्युझीलंड विरुद्धच्या कसोटीत इंग्लंड पराभवाच्या छायेत; दुसऱ्या डावात १२२ वर ९

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडच्या गोलंदाजानी विजय निश्चित केला आहे. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ९ गडी गमावत १२२ धावा जोडल्या होत्या. इंग्लंडच्या संघाकडे अवघ्या ३७ धावांची आघाडी आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ३०३ धावांची मजल मारली. या डावात सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॅनियन लॉरेन्सने प्रत्येकी ८१ धावांची सर्वाधीक खेळी साकारली. न्युझीलंडकडुन या डावात ट्रेन्ट बोल्टने शानदार पुनरागमन करत सर्वाधिक ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात ऩ्युझीलंडच्या संघाने ३८८ धावांची मजल मारली. न्युझीलंड कडुन विल यंगने सर्वाधिक ८२ धावांची खेळी साकारली. त्याला सलामीवीर डेवॉन कॉनवे (८०) आणि रॉस टेलर(८०) यांनी चांगली साथ दिली. पहिल्या डावात न्युझीलंडने निर्णायक ८५ धावांची आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला न्युझीलंडच्या गोलंदाजानी खिंडार पाडले. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने ९ गडी गमावत १२२ धावांपर्यंत मजल मारली होती. ओली स्टोन आणि जेम्स अँडरसन खेळपट्टीवर होते. चौथ्या दिवशी न्युझीलंडच्या संघाचा विजय निश्चीत मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!