Share

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाच्या नावावर जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.

या सामन्यात दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ८ गडी राखुन १४७ धावांचे लक्ष्य दिले. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार मारले. मात्र एकही षटकार लगावला नाही. फक्त कर्णधार नव्हे तर संघातील एकाही खेळाडूने सामन्यात षटकार न लगावल्याने अनेक विस्फोटक फलंदाज असलेल्या दिल्ली कॅपीटल्स संघाच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात फलंदाजांसाठी नंदनवन मानल्या वानखेडे स्टेडियमवर एका डावात एकही षटकार न ठोकणारा दिल्ली कॅपिटल्स पहिला संघ बनला.

दुसरीकडे याच सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी ७ षटकार मारले. याच मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून १५ तर, राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात तब्बल २३ षटकार फलंदाजांनी खेचले होते. अशाप्रकारे आतापर्यंत तीन सामन्यात मिळून या मैदानावर ४५ षटकार ठोकण्यात फलंदाज यशस्वी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!