मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद राहणार आहे.
दरम्यान कोरोनाचा कहर आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मीमालिकेच्या सेटवर पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या घरातच त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार मालिकेच्या सेटवर कोरोना चाचणी करणं बंधनकार आहे. त्यामुळं तारक मेहताच्या सेटवर 110 जणांची चाचणी घेण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळं सध्या सेटवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
- पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
- सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच; चंद्रकांतदादांचा टोला
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

