Share

पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम

Published On: 

मुंबई – देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे या साधूंचे प्राण गेले असल्याचे आरोप नेहमीच होत असतात. सध्याही या प्रकरणावरून सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप असून ह्या प्रकरणाची आग अजूनही धगधगतीच आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले या गावात गेल्यावर्षी 16 एप्रिल रोजी दोन हिंदू साधुची आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थानी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी गावातील 115 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये 9 अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. ऐन कोरोना लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या हत्याकांडानंतर शिवसेना पक्षाला भारतीय जनता पक्षानं चांगलंच धारेवर धरलं होतं.

घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं असून याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत. पालघरला साधूची अमानुष हत्या होऊन 1वर्ष होइल मात्र अजुनही न्याय मिळाला नाही. यापुढेही आक्रमकतेने न्यायाची मागणी करणार आहोत असे कदम जाहीर केले आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या द्वारा पासून सरकारच्या द्वारा पर्यंत पालघर साधूच्या हत्या प्रकरणी नियमांचे पालन करीत न्यायाची मागणी करणार असल्याचे कदम यांनी जाहीर केले होते मात्र त्यांना प्रशासनाने त्यांना अडविले. यानंतर बोलताना कदम म्हणाले,पालघर साधू हत्याकांडात, न्यायाची मागणी करत आहोत मात्र ठाकरे सरकारने आम्हाला थांबविले आहे.परंतु जोपर्यंत आपल्या संघर्षाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, तो सुरूच राहणार आहे असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!