उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधितांची रुग्णसंख्येने ५ हजाराचा टप्पा पार केला आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील यंत्रणेवर वाढत्या रुग्णसंख्येमुळे अतिरिक्त ताण पडत आहे. ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर सुविधाही अपुऱ्या ठरत आहेत. त्यातच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच विविध सोयी-सुविधाही तोकड्या ठरत आहेत.
या प्रतिकुल स्थितीत कोरोनाविरूध्द निकराचे युध्द सुरू असल्याचे चित्र शासकीय व खाजगी रुग्णालयात दिसत असून रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्ण नातेवाईकांचीही शर्थीची झुंज सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार २७ हजार ८४४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २१ हजार ७४७ जणांनी यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज घेतला आहे. ६६७ जणांचा कोरानामुळे बळी गेला आहे तर ५ हजार २८० रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सद्य स्थितीत जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयाच्या कोरोना कक्षात कोरोग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उस्मानाबाद तालुक्याची लोकसंख्या अधिक असून येथील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत आहेत. त्यातच जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर मोठा भार पडत आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी सद्य स्थितीत ३५२ ऑक्सीजन बेड उपलब्ध असून आणखी २०० बेडचे काम सुरू करण्यात आले आहे.
- पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
- सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच; चंद्रकांतदादांचा टोला
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

