Share

अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे. उच्च न्यायालयाने या आरोपांच्या चौकशीसाठी सीबीआयला १५ दिवसांचा अवधी दिला असून चौकशी आधी देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असा दावा भाजप नेत्यांनी केला होता.

यानंतर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण व मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने लेटरबॉम्ब टाकत अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. दरम्यान, अनिल परब यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

आज भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. त्यांनी जमा केलेली सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी झाली पाहिजे. त्यांचा खरा सूत्रधार कोण आहे ? त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी करताना त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याकडे होता.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!