औरंंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झालेल्या २३ रूग्णांचा उपचारादरम्यान गेल्या २४ तासात घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या २३ रूग्णांमध्ये ८ रूग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची माहिती घाटी रूग्णालय प्रशासनाने रविवारी (दि.२३) कळवली आहे. दरम्यान, घाटी रूग्णालयात ४४० कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात येत असून त्यापैकी ३६३ जणांची प्रकृती गंभीर असून ७७ जणांची प्रकृती सामान्य आहे.
घाटी रूग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर सुपर स्पेशालिटी विभागात आणि मेडिसीन विभागात उपचार करण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात कोरोनाची लागण झालेल्या २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ४ रूग्ण, जालना जिल्ह्यातील ३, बीड येथील १ अशा ८ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २३ रूग्णांपैकी १३ रूग्ण हे पुरूष आहेत, तर १० महिला रूग्ण आहेत. घाटी रूग्णालयात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, घाटी रूग्णालयात आतापर्यंत ९ हजार ८०० कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आतापर्यंत घाटी रूग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या ४ हजार ७७४ जणांना सुटी देण्यात आली आहे. रविवारी देखील घाटीतून कोरोनामुक्त झालेल्या १९ जणांना सुटी देण्यात आली असल्याची माहिती घाटी प्रशासनाने कळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

