🕒 1 min read
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजींच्या रूपाने राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम,समर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभले आहे. अशी कौतुकाची थाप देत मुख्यमंत्री ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली आहे.
तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितंच जिंकेल. पुरोगामी,प्रगत विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील,जगातील अव्वल राज्य बनण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंवर दाखवत अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्धवजींच्या रुपानं राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम,समर्थ;सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभलं आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चितंच जिंकू.पुरोगामी,प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील,जगातील अव्वल राज्य बनवू,असा मला विश्वास आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 27, 2021
दरम्यान कोकण व महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट आल्याने राज्य शोकाकुल आहे, राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळणे गरजेचे आहे. म्हणून वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस, मदत पोहचण्याआधी जाहिरात पोहोचली-भाजपची टीका
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
