🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : देशावर आर्थिक संकट आले आहे. जागतिक मंदीमुळे देशाचा आर्थिक विकास खुंटला आहे. तर आता देशाच्या आर्थिक विकासाबाबत अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटला असून ५ टक्क्यांवर आला आहे. हा आता पर्यंतचा नीचांक आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलत असून तीला उतरती कळा लागलं असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट ५ टक्क्यांवर आला आहे. याआधी हा ग्रोथ रेट ५.८ टक्के होता. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचंच हे आकडे सांगत आहेत.
दरम्यान देशात सध्या आर्थिक मंदी आहे. या मंदीमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर लाखो तरुण अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. अशी सगळी विदारक आर्थिक परिस्थिती आहे. तर ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत. त्यामुळे मोदी सरकार नेमक करतय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
- साताऱ्यातील राजकीय समीकरण बदलली, उदयनराजेंच्या निर्णयावर ठरणार रामराजेंचा पक्ष
- भोसरीतील अंतिम आरक्षणाचे प्रस्ताव पाठवा, तत्काळ निकाली काढणार – जिल्हाधिकारी
- अवधूत तटकरेंच्या पक्षांतरावर सुनील तटकरेंनी केले भाष्य, म्हणाले…
- ठरलंं तर मग ! कॉंग्रेसचा ‘हा’ आमदार करणार १ सप्टेंबरला भाजपात प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
